Welcome to स्वराज्य ॲग्रो   Click to listen highlighted text! Welcome to स्वराज्य ॲग्रो
Uncategorized

वाठार स्टेशन येथे दिवंगत माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंती निमित्त दि २५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

वाठार स्टेशन येथिल आशिर्वाद हॉस्पिटल व समर्थ मेडिकल यांचे सयुक्त विद्यमाने सकाळी १० ते २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

आदर्की ( स्वराज्य अग्रो वृतसेवा ) दिवगंत माजी  खासदार लक्ष्मणराव पाटील ( तात्या ) यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथे डॉ. सुयोग लेंभे यांच्या संकल्पनेतून बुधवार, दि. २५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आशीर्वाद हॉस्पिटल व समर्थ मेडिकल, वाठार स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे समाजोपयोगी पाऊल उचलण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन खासदार आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या हस्ते होणार आहे

राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर अध्यक्षपदी राहणार  आहेत. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आशीर्वाद हॉस्पिटल जुन्या पोलीस स्टेशन समोर  शिबिर होणार आहे. या शिबिराचे आयोजन डॉ. सुयोग लेंभे, डॉ. देवयानी लेंभे, सुहास जाधव आणि शामल जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!