Uncategorized
सासवड येथील माळीबेंद येथिल शिक्षक कमी केल्यास पालक आंदोलन करणार
फलटण तालुक्यातील माळीबेंद येथे दोन शिक्षक कार्यरत आहेत पण एक शिक्षक दुसरया शाळेत बदली होणार असल्याने पालकातून संताप व्यक्त होत आहे
फलटण तालुक्यात शिक्षकांचा दुष्काळ
आदर्की : फलटण तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद वस्ती शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत शिक्षक उपलब्ध नसल्याने शैक्षणिक अध्यापनावर मोठा परिणाम होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
ग्रामीण व वाडी-वस्ती भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळ शिक्षण मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या वस्ती शाळांमध्येच शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शिक्षकांची पदे रिक्त असताना त्यावर तातडीने नियुक्त्या करण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.
शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग, अभ्यासक्रम पूर्ण करणे तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर विपरीत परिणाम होत आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक पालकांना आपल्या मुलांना दूरच्या शाळेत पाठविणे शक्य नाही. त्यामुळे स्थानिक शाळाच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रमुख आधार आहे.
दरम्यान, शिक्षकांची तातडीने नियुक्ती करून शाळांमधील शैक्षणिक व्यवस्था सुरळीत न केल्यास पालक आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मागणीची दखल न घेतल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे.
प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा गांभीर्याने विचार करून रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रीया
फलटण तालुक्यातील माळीबेंद ( सासवड झणझणे ) येथे १७ पट आहे या ठिकाणी दोन शिक्षक अध्यापन करत आहेत पण पंचायत समिती फलटण यांनी पत्राव्दारे एका शिक्षकांला दुसरया शाळेत हजर राहण्यास सांगितले आहे
माळीबेंद शाळेत एक शिक्षक अन चार वर्ग अशी अवस्था होणार आहे त्यामुळे आम्ही पालक शाळेला टाळे ठोकून पंचायती समिती समोर विद्यार्थी पालक आंदोलन करणार आहे
अमोल रासकर संचालक फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती
सासवड ता फलटण
प्रतिक्रिया
फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत १२० शिक्षक कमी असल्याने पंचायत समिती ने ठराव करून गटविकास अधिकारी यांचे आदेशानुसार १५ पट असणारया २५ शाळेतील शिक्षक काढून घेऊन जादा पट असणारया शाळेत नेमणूक करण्यात आली आहे
शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया राबवत आहेत पण कधी होईल सांगता येत नाही
मठपती शी . जी .
गट शिक्षण अधिकारी फलटण