Uncategorized
वाठार स्टेशन पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी शेतकरयाच्यातून समाधान
वाठार स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रान्समीटर चोरीत वाढ झाली होती तर तांब्याची तार चोरीत वाढ झाली होती त्याचा छडा लावून दोन आरोपीना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला आहे
वाठार स्टेशन ता. कोरेगाव – वाठार पोलीस ठाणे हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक डीपी मधील तांब्याच्या तारा चोरीचे सत्र सुरू होते. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी सूचना दिल्या होत्या.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकासह कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. गोपनीय खबऱ्यांमार्फत माहिती मिळवून डीपी चोरी करणाऱ्या टोळीची माहिती काढली.
संशयित आरोपी बनवडी, ता. कोरेगाव येथे असल्याची खबर मिळताच सुशिल भोसले यांनी डी. बी. पथकासह सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आणि त्यांच्या टीमच्या मदतीने आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींनी वाठार हद्दीतील नांदवळ, अरबवाडी, अनपटवाडी, देऊर, पिंपोडे खु. या भागात एकूण ७ ठिकाणी डीपी चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्याकडून रुपये २,०४,०००/- किमतीच्या तांब्याच्या तारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उघडकीस आलेले गुन्हे :
गु.र.नं. ७६/२०२६, ८४/२०२६, १२०/२०२६, १४३/२०२६,
१५१/२०२६, २०४/२०२६ आणि २१०/२०२६ – सर्व गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३२४ (४) सह भारतीय विद्युत कायदा कलम १३६ अन्वये दाखल होते.
सदर कारवाईत पोउनि गहिनीनाथ सातव, नितीन भोसले, पोहवा सर्जेराव सुळ, जितेंद्र शिंदे, सहदेव तुपे, अजय झुंजार, आनंदराव भोसले, धिरज यादव, प्रकाश चव्हाण, विवेक शिंदे, विठ्ठल काळे, प्रशांत गोरे, अधिक शेलार, प्रथमेश अलगुडे, एकनाथ सरगर, प्रतिक देशमुख, चालक पोहवा राहुल पवार यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोहवा सर्जेराव सुळ करत आहेत.
