Uncategorized
विजय ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे ३२ वी वार्षिक सभा दि.९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आदर्की बु ॥ येथे
विविध विषयावर होणार चर्चा
आदर्की — फलटण तालुक्यातील आदर्की बु॥ येथिल विजय ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सभा रविवार दि.९ ऑगष्ट रोजी सकाळी १० वाजता भैरवनाथ मंदिर सभागृह येथे होणार आहे.
यावेळी वार्षिक सभेपुढील विषय दि . १७/०८/२०२५ रोजी झालेल्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचुन कायम करणे. . ३१/०३/२०२६ अखेर संपलेल्या वर्षातील संस्थेच्या कामकाजाचा अहवाल ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक वाचुन कायम करणे.
सन २०२५-२०२६ चा लेखापरिक्षण अहवाल वाचून दाखविणे व त्यास मान्यता घेणे.
सन २०२५-२०२६ सालातील मा. संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणे.
सन २०२६-२०२७ सालाकरिता तयार केलेल्या अंदाज पत्रकास मान्यता देणे व मागील अंदाज पत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे.
जिल्हा निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनेल मधील पात्र वैधानिक लेखा परिक्षकांची चालू आर्थिक वर्ष सन
२०२६-२०२७ चे लेखापरिक्षण करण्याकामी नेमणुक करणे.
आदर्श उपविधी क्रमांक ७ संस्थेच्या अधिकृत भाग भांडवलात वाढ करणे बाबत.
संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या कर्जाबाबत माहिती घेणे.
सन २०२५-२०२६ साठी तडजोडीणे वसुल केलेल्या कर्ज प्रकरणास मान्यता देणे व सन २०२६-२७ सालासाठी तडजोडीणे कर्जप्रकरणे वसुली करणेसाठी संचालक मंडळाला अधिकार देणे बाबत.
प्रशिक्षण, कर्ज, गुंतवणूक, वसुली इ. बाबत वार्षिक धोरणाला मान्यता देणे.
सन २०२५-२०२६ मधील संशयित बुडीत कर्जखाती असणारी कर्ज रक्कम संशयित बुडीत कर्ज निधी तरतुदीतून संशयित बुडीत कर्ज खाती वर्ग करणे बाबत.
संस्थेचे कार्यक्षेत्र वाढ करणे व शाखा विस्तार करणे
संस्थेसाठी इमारत जागा खरेदी करणे व मुख्य कार्यालयास नुतन इमारत बांधकामास मान्यता देणे
विजय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या आदर्की बु.।। ता. फलटण, जि. सातारा या नावतील ग्रामीण बिगर शेती हे शब्द वगळून विजय सहकारी पतसंस्था मर्या आदर्की बु.।। ता. फलटण, जि. सातारा असे नाव करण्यास आदर्श उपविधी मध्ये दुरुस्ती मंजुरी मिळणे बाबत.
मा. अध्यक्षांच्या पर्व परवानगीने येणाऱ्या विषयावर विचार करणे. आदी विषयावर चर्चा करण्यात येणार असून सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापक राहुल पवार यांनी केले आहे.

