वाघोशी येथे जगतगुरु तुकाराम महाराज बिजो उत्सवा निमित्त दि २६ पासून पारायण सोहळा
वाघोशी ता फलटण येथे १२० वर्षापासून बिजो उत्सव साजरा केला जात आहे गत ४५ वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून यावर्षी ४६ वे वर्ष आहे या निमित्त काकड आरती ग्रंथ वाचन हरिपाठ प्रवचन कीर्तन भारूडी भजन कीर्तन जागर आदी कार्यक्रमाचे आयोजन दि २६ ते ५ मार्च पर्यंत आयोजन केले आहे
आदर्की – ( स्वराज्य अग्रो वृतसेवा ) फलटण तालुक्यातील वाघोशी येथे १२० वर्षापासून बीज उत्सव साजरा होत असून ४५ वर्षापासून अखंड पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते यावर्षी ४६ वे वर्ष आहे दिनांक 26 ते ५ मार्च पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आह
पारायण सोहळ्यात प्रवचनकार रमेश महाराज निर्मळ यांचे प्रवचन होणार आहे तर सप्ताहमधे काकड आरती ग्रंथ वाचन हरिपाठ प्रवचन कीर्तन भजन जागर आदी दैनदिन कार्यक्रम होणार आहेत
जालिंदर महाराज पोपट भोसले अनिल कोळेकर महादेव कोळेकर चव्हाण महाराज नंदू बाबा कुमठेकर अविनाश कदम यांची किर्तन सेवा तर दि १ मार्च रोजी लक्ष्मण महाराज यांचे भारुडी भजन होणार आहे काल्याचे किर्तन दिलीप झगडे महाराज यांचे होणार आहे तर विंचुर्णी कोराळे मोळ वाघोशी मांजरवाडी सोनके वडगाव पिराचीवाडी आदर्की बिबी या भजनी मंडळाचा जागर होणार आहे तरी परिसरातील भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन वाघोशी ग्रामस्थ व वाघोशी भजनी मंडळ यांनी केले आहे
