Welcome to स्वराज्य ॲग्रो   Click to listen highlighted text! Welcome to स्वराज्य ॲग्रो
Uncategorized

हिंगणगाव जिल्हा परिषद निवडणूकीत ॲड किरणताई नलवडे विजयी

हिंगणगाव जिल्हा परिषद गटात शिवसेना विरुद्ध भाजपा मध्ये निवडणूक चुरशीची होऊन जिल्हा परिषदेसाठी ॲड किरणताई नलवडे विजयी झाल्या तर पंचायत समिती साठी सौ सीमा सुरेश भोईटे ( भाजपा ) व संतोष कांरडे ( शिवसेना ) हे विजयी झाले

  • श्री संतोष कारंडे
आदर्की – फलटण तालुक्यातील हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार सारिकाताई अनपट व भाजपाचे उमेदवार ॲड किरणताई नलवडे यांच्यात काटेरी लढत होऊन ॲड किरणताई नलवडे यांना १११६६ मते मिळवून विजयी झाल्या तर हिंगणगाव पंचायत समिती गणातून  भाजपाच्या सौ .सिमा सुरेश भोईटे विजयी झाल्या तर सासवड पंचायत समिती गणातून शिवसेनेचे संतोष कारडे विजयी झाले  कार्यकर्त्यानी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण केली आनंद उत्सव साजरा केला
फलटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्रा महत्वाचा असणारा हिंगणगाव जिल्हा परिषद गट आ रामराजे नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजिंतसिंह नाईक निंबाळकर यांती प्रतिष्ठेचा केला होता
हिंगणगाव जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी राजेगटाचा बालेकिल्ला होता पण राजेगटाने शिवसेना ( शिंदे ) गटात प्रवेश करून जिल्हा परिषद व पंचायत समितीला उमेदवार उभे केले होते त्यामधे माजी जिल्हा परिषद सदस्य सारिकाताई अनपट यांना पुन्हा संधी दिली होती त्यामुळे तिसरयांदा संधी दिली होती
तर भाजपाने संतकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष विलासराव न लवडे यांच्या स्नुष्ना ॲड किरणताई निलेश नलवडे हा नविन चेहरा निवडणूकीत उतरवला होता मतमोजणी होता पाचशे दोनशे शंभर पन्नास मंतांनी आघाडी पिछाडी घेत काटेरी टक्कर झाली होती अखेर ॲड किरणताई  नलवडे तीन आ काड्याने आघाडी घेत विजयी ठरल्या
हिंगणगाव पंचायत समितीगणात भाजपाच्या उमेदवार  सौ सिमा सुरेश भोईटे विजयी झाल्या
तर सासवड पंचायत समिती गणात शिवसेनेचे उमेदवार संतोष कांरडे विजयी झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!