Uncategorized
हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघ माजी खा. रणजितसिंह निंबाळकर आणि आ .रामराजे निंबाळकर यांनी केला प्रतिष्ठेचा
हिगणगाव जिल्हा परिषद मतदार संघ व हिंगणगाव पंचायत समिती गण व सासवड पंचायत समिती मतदार संघात माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदार संघातील सर्व गावात भेटी दिल्या तर बिबी ताथवडा हिंगणगाव तांबवे येथे सभा घेतल्या तर प्रल्हादराव सांळुखे पाटील आ सचीन पाटील ॲड जिजामाला निंबाळकर शिवरूपराजे खर्डेकर भिमदेव बरूगंल यांनी सहभाग घेतला तर आ रामराजे नाईक निंबाळकर यांनी हिंगणगाव ताथवडा बिबी येथे सभा घेतल्या तर संजीवराजे निंबाळकर अनिकेतराजे निंबाळकर विश्वजितराजे निंबाळकर धैर्यशिल अनपट यांनी कोपरा सभा घेतल्या
. माजी खा.रणजितसिंह निंबाळकर आणि आ . रामराजे निंबाळकर यांनी हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघ केला प्रतिष्ठेचा
आदर्की – फलटण तालुक्यातील हिंगणगाव जिल्हा परिषदगट राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला होता तो धोम बलकवडीचे पाणी आल्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला आता मतदार संघातुन हात अन घड्याळ गायब झाले पण नेते तेच फक्त पक्ष बदलले असले तरी माजी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर व माजी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचार सभा गाजवून दोघांनी प्रतिष्ठेचा बनला आहे
फलटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असणारा हिंगणगाव जिल्हा परिषद गट स्वर्गीय चिमणराव कदम व ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी पंधरा वर्ष राष्ट्रीय काँग्रेसच्या ताब्यात ठेवला होता
त्यानंतर धोम बलकवडीच्या डाव्या कालव्यातून पाणी आद्रकीच्या माळावर पाणी पूजन झाले व जिल्हा परिषद च्या निवडणुका लागल्या त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसच्या ताब्यातून राष्ट्रवादी राजेगट राष्ट्रवादीच्या ताब्यात हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघ गेला तो परत घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो झाला नाही कारण गत पंचवार्षिक निवडणुकीत धैर्यशील उर्फ दत्ताअनपट व प्रत्लादराव साळुंखे पाटील यांचे चिरंजीव धनंजय साळुंखे पाटील यांच्यात लढत झाली त्यावेळी भारतीय जनता पक्षाने सुरेश निंबाळकर यांना उमेदवारी दिली त्यावेळी त्यांनी फक्त 888 मते मिळाली परंतु राष्ट्रीय काँग्रेसचे धनंजय साळुंखे पाटील यांचा निसटता पराभव झाला
त्यानंतर राजकीय नेते यांनी पक्ष बदलून राजे गटांनी यांनी शिवसेना तर माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व प्रल्हाद साळुंखे पाटील यांनी भारतीय जनता पार्टी मार्फत उमेदवार उभे केले आहेत त्यांनी हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघात सभांचा धडाका उडवून जिल्हा परिषद ची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे
हिंगणगाव जिल्हा परिषद . संघात चौरगी तर गणात दुरंगी लढत होत आहे
चौकट हिंगणगाव जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या ॲड किरणताई नलवडे तर हिंगणगाव पंचायत समिती सौ सिमा सुरेश भोईटे सासवड पंचायत समिती गणाचे संतोष खताळ यांचे रुपाने नविन चेहरे आणले आहेत
राजेगट शिवसेना पक्षाने सौ सारिकाताई अनपट यांना सलग तिसरयांदा संधी दिली आहे तर हिंगणगाव पंचायत गणातून माजी सभापती स्व . शरददादा भोईटे यांच्या पत्नी श्रीमती सिमा भोईटे यांना तर सासवड पंचायत समिती गणातून रांतोष कारडे यांना उमेदवारी दिली आहे
