Welcome to स्वराज्य ॲग्रो   Click to listen highlighted text! Welcome to स्वराज्य ॲग्रो
Uncategorized

हिंगणगाव जिल्हा परिषद गटात निवडणूकीच्या धामधुमीत जेवनावळी सुरू असताना एका गावात मतदान सहाशे अन जेवनाची ताटे नऊशे झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे

हिंगणगाव जिल्हा परिषद गटात निवडणुक रंगात आली असताना पोहे उपमा मिसळ पाव नंतर बासुंदी चपाती बिऱ्हानी आता हॉटेल ढाबे बुक करून गावागावा गाडया भरून जेवनासाठी नेत असताना एका गावात मतदान सहाशे ते सातशे आहे परंतु जेवनाची ताटे नऊशे झाल्याची चर्चा सुरू आहे

फलटण तालुक्यातील हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघातील गटाची व हिंगणगाव गण व सासवड पंचायत समिती गण याची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत असतानाच आता निवडणुकीला रंग आला असून प्रचाराच्या गाड्या फिरत आहेत तर घरोघरी जाऊन उमेदवार नेते कार्यकर्ते आपली भूमिका समजून सांगत असताना कार्यकर्त्यांना जेवणावेळी सुरू झाली असतानाच मतदारांनी आपली गारानी नेत्यांजवळ मांडल्याने त्यांनाही आता जेवणावाली सुरू झाली असल्याचे ढाब्यावरील गर्दीवरून दिसत आहे प्रारंभी मिसळपाव वडापाव उपीट पोहे त्यानंतर घरगुती जेवण उमेदवार गाडीतून पोहोच करीत होते आता निवडणूक रंगात आली असताना कार्यकर्ते ची संख्या कमी पडू लागल्याने आता ढाब्यावर जेवणावळी सुरू झाले असून प्रत्येक ढाब्यावर शंभर ते दीडशे ताटांची ऑर्डर दिली जात आहे परंतु गावातून गाड्या भरून जाताना मतदार महिला पुरुषाबरोबर मतदार यादीत नाव नसणारे व अल्पवयीन मुले मुली गाडीत बसून ढाब्यावर जात असल्याचे दिसत आहे त्यामुळेढाब्यावर गर्दी वाढली आहे परंतु मतदार 600 आणि ताटे 900 अशी चर्चा गावोगावी सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!