Welcome to स्वराज्य ॲग्रो   Click to listen highlighted text! Welcome to स्वराज्य ॲग्रो
Uncategorized

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी प्रा विजय काकडे यांची निवड

फलटण येथे अग्रोन्युज चॅरिटेबल ट्रस्ट आयोजीत छत्रपती संभाजी महाराज ९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी प्रा विजय काकडे यांची निवड करण्यात आली असून साहित्य संमेलन २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे

आदर्की – ( स्वराज्य अग्रो प्रतिनिधी ) फलटण येथील छ. संभाजी महाराज ९ व्या साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. विजय काकडे यांची निवड:
अग्रोन्युज चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन अध्यक्षपदी विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे विभाग प्रमुख व सुप्रसिद्ध कथालेखक, कथाकथनकार प्रा. विजय काकडे यांची निवड करण्यात आली आहे. अग्रोन्युज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सस्ते यांनी काकडे यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे. फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालय येथे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी हे साहित्य संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनात,मुलखात, कथाकथन,कविसंमेलन, पारितोषिक वितरण असा भरगच्च कार्यक्रम आहे.
प्रा. विजय काकडे यांनी मागील २५ वर्षात कथा, कविता, व्याख्याने, मराठी गझल इत्यादींच्या माध्यमातून भरीव कार्य केले आहे. काकडे यांची ५ पुस्तके प्रकाशित आहेत त्यांना आजवर ३ राष्ट्रीय व २५ राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या साहित्यांनाही अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. महाराष्ट्रभर कथाकथने व व्याख्यानाच्या माध्यमातून विजय काकडे यांचे कार्य सर्वश्रुत आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेवून त्यांची छ. संभाजी महाराज साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीचे सबंध बारामती परिसर व फलटण तालुक्यातील त्यांचे मूळ गाव असलेल्या सासवड परिसरातून संमेलनाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!