Uncategorized
बारामती येथील विमान अपघातात तरडगाव येथील पोलीस जवान विधीत जाधव शहीद
तरडगाव तालुका फलटण येथील विधीत जाधव हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर विमानाने येत असताना बारामती येथे विमान अपघात वाहून ते शहीद झाल्याचे वृत तरडगाव येथेसमजतात गावावर येथे शोककळा पसरली व तरडगाव येथील सर्व बाजारपेठ बंद ठेवून ठीक ठिकाणी श्रद्धांजलीचे फलक लावून श्रद्धांजली वाहण्यात आली होती
तरडगाव/ बारामती येथील विमान दुर्घटनेत बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता गहिवरून गेली.त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे सुरक्षारक्षक फलटण तालुक्यातील तरडगाव येथील विदीप दिलीप जाधव ( वय ३७ ) हे देखील मृत्युमुखी पडल्याने परिसरात शोककळा पसरून हळहळ व्यक्त करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वीच आपल्या तरडगाव गावी येऊन कुटुंब व मित्रमंडळीची भेट घेऊन पुन्हा सेवेत रुजू झालेले विदीप जाधव यांचा झालेला अपघाती मृत्यू प्रत्येकालाच चटका लावून गेला आहे. एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर मित्रांमध्ये मिसळून राहणाऱ्या शांत व सतत हसमुख स्वभावाच्या या व्यक्तिमत्वाच्या अशा प्रकारे अचानक जाण्याने त्यांचा मित्रपरिवार,ग्रामस्थ देखील गहिवरले.
गेली अनेक वर्षे प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या जाधव यांचे २००५ मध्ये दहावी पर्यंत शिक्षण तरडगाव येथे झाले.त्यानंतर फलटणला दोन वर्षे ॲग्रीचे शिक्षण घेतले. ॲकॅडमीत काही महिने शिक्षण घेतल्यावर सोलापूरला त्यांनी पोलिस भरतीचे ट्रेनिंग घेतले.२००९ मध्ये ते मुंबई पोलिस दलात भरती झाले. त्यानंतर २०११ मध्ये स्पेशल पोलिस युनिट मध्ये दाखल होऊन ते उच्चनायलयाचे न्यायाधीश सानप यांचे सुरक्षारक्षक बनले.
२०१४ ते २०१९ दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुरक्षारक्षक म्हणून सेवा बजावली. २०१९ नंतर ते आजअखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक म्हणून सेवा बजावित होते.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा ,मुलगी असा परिवार आहे.चौकट -तरडगाव बाजार पेठ बंद
विदीप जाधव यांचा मित्रपरिवार मोठा होता.ते कायम त्यांच्या संपर्कात असतं.मित्रांबरोबर कुटुंब अन् गावची त्यांना ओढ असायची.सोमवारीच ते आपल्या गावी येऊन अनेकांना भेटून गेले होते.त्यानंतर विमान दुर्घटनेतून काळाने त्यांच्यावर घाला घातला. यामुळे तरडगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.ठिकठिकाणी श्रद्धांजली फलक लावण्यात आले होते.