Welcome to स्वराज्य ॲग्रो
Click to listen highlighted text!
Welcome to स्वराज्य ॲग्रो

सौ . सारिकाताई अनपट यांची हिंगणगाव जिल्हा परिषद गटात प्रचारात आघाडी
आदर्की -फलटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा व भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेला हिंगणगाव जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सो सारिका ताई दत्ता बापूअनपट यांनी बावीस गावात प्रचारात आघाडी घेतली असून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ग्रामीण भागात केलेली विकासाची कामे सांगून विश्वास संपादन केल्याचे दिसत असून प्रचारातही आघाडी घेतली आहे
फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवून ते विजयी झाले आहेत त्याप्रमाणे हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून सौ . सारिकाताई अनपट व श्री धैर्यशील उर्फ दत्ता बापू अनपट सलग दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिल्यानंतर संपूर्ण जिल्हा परिषद मतदार संघात रस्ते अंगणवाडी बालवाडी जिल्हा परिषद शाळा कंपाऊंड प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक उपकेंद्र त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा वैद्यकीय अधिकारी कर्मचारी याबरोबर प्रत्येक गावात स्ट्रीट लाईट व्यायाम शाळा देण्याचा प्रयत्न करीत असताना वैयक्तिक लाभाच्या वस्तू मतदार संघातील सर्वसामान्य वर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून राजे गटाशी एकनिष्ठ राहिल्याने अनपट यांच्या रूपाने सलग दोन टर्म व चार वर्ष प्रशासकीय राजवट असताना त्यांनी हिंगणगाव जिल्हा परिषदेची जोडलेली नाळ कायम ठेवल्याने शिवसेना पक्षाने याचा विचार करून त्यांना परत तिसऱ्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे यावेळी हिंगणगाव जिल्हा परिषदेचे आरक्षण सर्वसाधारण महिला असल्याने सो सारिका धैर्यशील उर्फ दत्ता बापू आनपट यांना उमेदवारी मिळाली असून त्यांनी प्रत्येक गावात जाऊन बैठका कोपरासभा घेऊन मतदारांना राजेगट व शिवसेना यांनी केलेली कामे सांगण्यात यशस्वी झाल्याने त्यांना मतदाराची साथ मिळत असल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!