Welcome to स्वराज्य ॲग्रो   Click to listen highlighted text! Welcome to स्वराज्य ॲग्रो
Uncategorized

आदर्की खुर्द येथील श्री निष्णाई देवीच्या यात्रेस प्रारंभ दि. ३ रोजी छबिना दि . ४ यात्रेचा मुख्य दिवस

चांगभल बोला चांगभल च्या जयघोषात आदर्की खुर्द येथील ग्रामदेवता श्री निष्णाई देवीच्या मानाच्या काठीला १ ००१ नारळाचे तोरण बांधून पुजाराने पुजन केले व हजारो भक्तांच्या उपस्थितीत मानाची काठी उभी करून यात्रेला सुरुवात झाली

आदर्की – आदर्की खुर्द येथील श्री निष्णाई देवीच्या यात्रेस प्रारंभ झाला आहे

मंगळवार दि .३ रोजी छबिना असून त्या निमित्त लोंटागण घालणे नवस फेडणे दुपारी तीन वाजता श्री निष्णाई देवी

पालखीतून श्री वाघजाई देवीच्या भेटीसाठी वाघदरा नावाच्या डोंगरावर वाजत गाजत खांद्यावर नेली जाते

सांयकाळी पालखीतुन श्री निष्णाई व वाघजाई देवी गावात येऊन वाजत गाजत सनई चौघडे ढोल ताशा व गुलालाची उधळण करीत छबिना मंदिरात रात्री ११ वाजता येतो

बुधवार दि . ४ रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे सकाळी प फुलाने सजवलेल्या पालखीत श्री निष्णाई देवी व श्री वाघजाई देवी यांना ठेवून पालखी सोहळा ग्राम प्रदिक्षणासाठी गावात घरोघरी दर्शनासाठी जातो त्या ठिकाणी भाविक भक्त पुजा करतात नारळ फोडतात व पेढयाचा प्रसाद वाटला जातो

मंदिरात दिवसभर देवदर्शना साठी गर्दी असते क भाविकांना महाप्रसाद दिला जातो यात्रेत खेळणी मिठाई आदी दुकाने येतात

यात्रेकरूंच्या करमणुकीसाठी दि . ४ रोजी सकाळी १० वाजता साहेबराव नांदवळकर यांचा लोकनाटयाचा कार्यक्रम आयोजित केला आहे

सांयकाळी सात वाजता पालखी सोहळा मंदिरात येऊन महाआरती होऊन यात्रेची सांगता करण्यात येते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!