Welcome to स्वराज्य ॲग्रो   Click to listen highlighted text! Welcome to स्वराज्य ॲग्रो
Uncategorized

निवडणुका जिल्हा परिषदेच्या मोर्चेबांधणी ग्रामपंचायतची

 

आदर्की – फलटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना १०० ग्रामंपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाल पुढील महिन्यात संपत असल्याने निवडणुका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या असल्या तरी ग्रामपंचायतीची मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे फलटण तालुक्यात आठ जिल्हा परिषद गट व सोळा पंचायत समिती गणातील अर्ज भरून उमेदवारानी प्रचाराला सुरुवात केली आह त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे पण फलटण तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा कार्यकाल पूर्ण होऊन वर्ष दीड वर्ष झाले तर आगामी महिन्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपत आहे त्यामुळे गावोगावी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अर्ज दाखल केलेले उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत असल्याचे चित्र आहे

पण ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहिर झाले आहे

त्यामुळे सभाव्य सरपंच पदाचे उमेदवार प्रचारात आघाडी घेत असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना खुष करण्यासाठी पुढे पुढे करित आहे कारण पुढील काळात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीवेळी तालुक्याच्या नेत्यांनी आपली सरपंच पदाची शिफारण करण्यासाठी धडपड सुरू आहे

फलटण तालुक्यात होणारया ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच निवडी होणार असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणुकीची मोर्चे बाधणी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे

चौकट

  1. फलटण तालुक्यात विधानसभा निवडणुकीत फलटण नगर परिषद निवडणुकी नंतर आठ वर्षानी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत असताना बहुतांशी ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपणार असल्याने तालुक्यातील व उमेदवार आपल्या वार्डात नेण्यासाठी चढाओढ लागली आहे

संपादक सुर्यकांत निंबाळकर ९४०३३४८६१

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!