Welcome to स्वराज्य ॲग्रो   Click to listen highlighted text! Welcome to स्वराज्य ॲग्रो
https://swarajyaagro.live/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gif

फलटण तालुक्यातील गोरगरिबांचे कैवारी दिवगंत चिमणराव कदम ( साहेब

 

फलटण तालुक्यातील प्रामिण भागातील गिरवी येथिल शेतकरी कुंटुबांत जन्मलेले चिमणराव कदम (साहेब यांनी शालेय जीवनापासून संघटन जोपासुन उच्च शिक्षण घेऊन पंचायत समिती सभापती ते राज्य रोजगार हमी योजना अध्यक्ष पद भुषविले दुष्काळी भागातील पाणी प्रश्न गाव ते विधान सभेत हिंरारीने मांडून सोडून सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांची आज जयंती निमित विनम्र अभिवादन

गिरवी (ता. फलटण) येथील शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले चिमणराव कदम बांच्या नेतृत्वगुणांना खऱ्या अभनि मुधोजी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना संधी मिळाली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून ते निवडून आले होते. आपल्या ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पंचायत समितीचे सभापती ते आमदार पदापर्यंतच्या कालखंडात त्यांनी घेतलेले राजकीय व सामाजिक निर्णय सातत्याने चर्चे चा विषय बनत होते. खऱ्या अथनि काँग्रेसचे विचार जोपासणारे नेते महणून फलटणकर जनता त्यांच्याकडे पाहत होती. राज्याच्या पाणीप्रश्राबरोबरच सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांनी अनेक प्रस्न विधान सभेत मांडले

फलटण तालुक्यातील ८४ दुस्काळी गावांना कृष्णा खोरयातील पाणी मिळावे म्हणून राजकीय सघर्ष केला

त्यांनी दुस्काळी परिस्थिती लोकाच्या हातांना काम देण्यासाठी शेकडो पाझर तलाव नालाबांध रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पुर्ण केले त्यामुळे पाऊसाळयात वाहून जाणारे पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न केले

त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाली

त्या प्रमाणे गावात गाव वाडी वस्ती तेथे रस्ते शाळा एस टी . पाणी आधी मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या

 

राज्याच्या विधानसभेमध्ये पाणीप्रश्रावर बुलंद आवाजात समस्या मांडून शेती पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सतत १५ वर्षे प्रपान करणारे चिमणराव कदम खऱ्या अथनिकेवळ राजकारणी म्हणून नयो, तर तळमळीचे नेते महणूनच फलटण तालुक्याला परिचित होते.

ग्रामीण जनतेतील मुलांना शिक्षणाच्या वाटा उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांनी उभारलेले काम आज शहरामध्ये राजीव गांधी तंत्रनिकेतनच्या माध्यमातून समाजासमोर उभे आहे. चिमणराव कदम यांचा जन्म २ मार्च १९४० रोजी गिरवी येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील शंकरराव कदम हाडाचे शेतकरी होते. शेतकरी कुटुंबातून आलेल्या चिमणरावांना शिक्षणाबदल मोठी आस्था असल्याने फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळत गेला. फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी चिमणराव कदम यांच्यामध्ये असलेली सामाजिक विर अनुभवल्याने त्यांना तालुक्याच्या राजकारणात संधी दिली, असे म्हटले तर वावगे होणार नाही. मुधोजी महाविद्यालयातून बी. ए. ची पदवी घेतल्यानंतर फलटण पंचायत

 

पंचायत समितीच्या सभापतिपदानंतर १९७९ ते ८० या कालावधीत त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. एक वर्षाच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीवर ठसा उमटविला आणि त्यानंतर १९८० मध्ये राज्याच्या विधानसभेवर आमदार म्हणून मताधिक्याने ते निवडून गेले. मग मात्र सलग १५ वर्षे त्यांनी मागे वळून पाहिले नाही. १९८० ते १९९५ या १५ वर्षाच्या विधानसभा सदस्यपदाच्या कालावधीत कृष्णा खोऱ्यातील पाणी प्रश्नावर अनेक वेळा विधानसभा दणाणून सोडली होती. विधानसभेत पाणी प्रभाकर त्यांनी मांडलेले विचार आजही विधानसभेच्या वाचनालयात अन्य सभासदांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरतात. १९८५ मध्ये त्यांना एक वर्षासाठी राज्याच्या रोजगार हमी योजनेचे अध्यक्षपद मिळाले होते, त्यावेळीही त्यांनी मजुरांना योग्य प्रकारे रोजगार मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आजही सर्वज्ञात आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे त्यांचे

 

राजकारणातील गुरू होते. या राजकीय कारकिदीत सलग १५ वर्षे ते जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत होते. दहा वर्षांपूर्वी फलटण तालुक्यात नव्याने सहकारी साखर उद्योग उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण, त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

 

आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी केवळ राजकारण केले नाही, तर ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या अनेकविध संधी उपलब्ध होण्यासाठी १९७५ मध्ये अनेकविध संधी उपलब्ध होण्यासाठी १९७५ मध्ये जयभवानी शिक्षण संस्थेची स्थापना करून तालुक्यात माध्यमिक विद्यालयांच्याबरोबर कृषी, डी. एड., बी. एड. महाविद्यालये सुरू केली,

 

गावात सभा असेल तर साहेबांचे विचार एकण्यास लोकांच्यात उत्सुकताच असायची अन् स्वार्थासाठी दुरावलेल्यांना खरपुस समाचार घेतील काय या भीतीने पडकीव असायची. चिमणराव कदम यांच्या राजकारणाचा आजही फलटण तालुक्यामध्ये ठसा उमटवत असून त्यांचे व्यक्तिमत्व नव्याने नेतृत्व करणारांना आदर्शवत असेच आहे. त्याच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!