Welcome to स्वराज्य ॲग्रो   Click to listen highlighted text! Welcome to स्वराज्य ॲग्रो
महाराष्ट्र

BMC Mayor 2026 Sheetal Gambhir Desai: ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून लढल्या, 125 मतांनी जिंकल्या; फडणवीसांकडून सभेत उल्लेख, आता मुंबईच्या महापौरपदासाठी आघाडीवर, कोण आहेत शीतल गंभीर?

BMC Mayor 2026 Sheetal Gambhir Desai: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपद खुल्या वर्गातल्या महिलेसाठी आरक्षित झालं आहे.

 

BMC Mayor 2026 Sheetal Gambhir Desai: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपद (BMC Reservation 2026) खुल्या वर्गातल्या महिलेसाठी आरक्षित झालं आहे. राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी काल आरक्षण जाहीर (Mayor Reservation Mahanagarpalika Marathi News) करण्यात आलं. मुंबई महानगरपालिकेसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदी कोणत्या महिला नगरसेवकाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Mumbai Municipal Corporation Election Result 2026)

मुंबई महानगरपालिकेवर महिला राज असणार आहे. यासाठी भाजपच्या नगरसेविका शीतल गंभीर-देसाई (Sheetal Gambhir) यांचं नाव मुंबईच्या महापौरपदासाठी आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. मुंबईच्या निवडणुकीत शीतल गंभीर यांनी वॉर्ड क्रमांक 190 मधून विजय मिळवला होता. (Mumbai Municipal Corporation Reservation 2026)

कोण आहेत शीतल गंभीर-देसाई? (Who Is Sheetal Gambhir Desai?)

शीतल गंभीर-देसाई शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांच्या कन्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 190 मधून शीतल गंभीर दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. ठाकरे गटाच्या वैशाली पाटणकर आणि भाजपकडून शीतल गंभीर यांच्यात लढत झाली होती. यामध्ये 125 मतांनी शीतल गंभीर यांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे माहिम दादर या विधानसभेत जिथे ठाकरेंचा गड समजला जातो त्याठिकाणी शीतल गंभीर या भाजपाच्या एकमेव नगरसेविका आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत केला होता उल्लेख- (BMC Mayor 2026)

भाजपा महिला मोर्चाच्या महिला अध्यक्ष म्हणूनही शीतल गंभीर यांच्यावर जबाबदारी आहे. शीतल गंभीर यांच्या कामाचं कौतुक स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शिवाजी पार्कवरील सभेत केले होते. तसेच आदित्य ठाकरेंवर टीका करताना, आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी माझी गरज नाही, त्यांच्यासाठी आमच्या उमेदवार शीतल गंभीर याच पुरेशा आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

मुंबईसाठी असे होते आतापर्यंतचे महापौर आरक्षण- (BMC Mayor Reservation 2026)

  1. 2000 सर्वसाधारण; हरेश्वर पाटील
  2. 2002 एससी; महादेव देवळे
  3. 2005 सर्वसाधारण; दत्ताजी दळवी
  4. 2007 ओबीसी महिला; डॉ. शुभा राऊळ
  5. 2009 सर्वसाधारण महिला; श्रद्धा जाधव
  6. 2012 सर्वसाधारण; सुनील प्रभू
  7. 2014 एससी महिला; स्नेहल आंबेकर
  8. 2017 सर्वसाधारण; विश्वनाथ महाडेश्वर
  9. 2020 सर्वसाधारण; किशोरी पेडणेकर
  10. 2026- सर्वसाधारण

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप – 89
शिवसेना ठाकरे गट – 65
शिवसेना – 29
काँग्रेस – 24 
मनसे – 6 
एमआयएम- 8 
एनसीपी – 3 
एसपी – 2 
एनसीपी शप – 1 
————-
एकूण- 227

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!